तंत्रज्ञान

Jio Recharge ;जिओने पुन्हा लाँच केले पाच नवे प्लॅन

Published by : Lokshahi News

मुंबई | मागील काही दिवसांत दिवसात एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लॅन २० टक्क्यांनी वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. रिलायन्सने जिओ फोनच्या ७५ रुपयांचा प्लॅनचा अवधी कमी केला आहे.त्याचबरोबर अन्य प्रीपेड प्लॅनमध्ये ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. नव्या अपडेटनंतर जिओने आपल्या प्लानमधून ओटीटी काढलं होतं. मात्र, आता रिलांयन्स जिओ ग्राहकांसाठी पाच नवे प्लॅन आणले आहेत.

डिस्ने हॉटस्टॉरसह जिओ प्लॅन आणला आहे. जिओने डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह योजना पुन्हा सादर केली आहे, परंतु किंमत वाढवली आहे. जिओ आता डिस्ने+हॉटस्टार सबस्क्रिप्शन ६०१ रुपयांच्या प्लॅनसह देत आहे. हा प्लॅन आधी ४९९ रुपयांचा होता.या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतील. डिस्ने हॉटस्टार प्लॅनसह १ वर्षासाठी सदस्यता घेतली जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

७९९ रुपयांचा आणखी दुसरा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी ६६६ रुपये होती. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच अमर्यादित कॉलिंग, जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध असतील. या प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे. एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येणार्‍या तिसरा प्लॅन १,०६६ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे.दरम्यान, या प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनची किंमत आधी ८८८ रुपये होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त ५ जीबी डेटा मिळणार आहे.

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना