'Jio Bharat V2 Team Lokshahi
तंत्रज्ञान

Jioचा धमाकेदार ऑफर; फक्त 999 रुपयांचा 4G मोबाईल फोन

रिलायन्स जिओने भारतात Jio Bharat 4G फोन लॉन्च केला आहे.

Published by : shweta walge

रिलायन्स जिओने भारतात Jio Bharat 4G फोन लॉन्च केला आहे. हा मोबाईल फोन लाँच करण्यामागचा उद्देश कंपनीच्या “2G-मुक्त भारत” व्हिजनला गती देणे हा आहे. या मोबाईलची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. 7 जुलै 2023 पासून विक्री सुरू होईल. कंपनीने पुष्टी केली की फोन देशभरातील रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

रिलायन्स जिओने लॉन्च केलेले 'Jio Bharat V2' ची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या इंटरनेट फोनपेक्षा सर्वात कमी आहे. 999 रुपयांमध्ये उपलब्ध 'Jio Bharat V2' चा मासिक प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 123 रुपये द्यावे लागणार आहेत.

देशात अजूनही 2G वापरणारे ग्राहक आहेत. जे ग्राहक सध्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी जिओने ही स्किम आणलीय. रिलायन्सचा दावा आहे की, 'जिओ भारत व्ही २'च्या माध्यमातून कंपनी १० कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडेल.

हा मोबाईल भारतात बनवलेला आणि फक्त 71 ग्रॅम वजनाचा आहे. 'Jio Bharat V2' 4G इंटरनेत सेवेवर काम करतो. यात HD व्हॉईस कॉलिंग, FM रेडिओ, 128 GB SD मेमरी कार्ड सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. मोबाईलमध्ये 1.77 इंच TFT स्क्रीन, 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा, 1000 mAh बॅटरी, 3.5 mm हेडफोन जॅक, शक्तिशाली लाऊडस्पीकर आणि टॉर्च आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा