तंत्रज्ञान

WhatsApp चं धमाकेदार अपडेट, तुमची चॅटिंग आणि मेसेजही सुरक्षित

WhatsApp ने अखेर एक जबरदस्त सुरक्षा कवच आणलं आहे.

Published by : Shamal Sawant

तुमच्या खासगी व्हाट्सअप चॅट्सचं संभाषण कुणाच्याच हाती लागणार नाही, कारण WhatsApp ने अखेर एक जबरदस्त सुरक्षा कवच आणलं आहे. 'अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी' या नावाखाली WhatsApp ने असं फीचर सादर केलं आहे, जे तुमचं चॅट १०० टक्के सुरक्षित करतं.लीक, फॉरवर्ड, एक्सपोर्ट सगळ्याला "संधीच नसेल"!

100% गोपनीयता

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे पर्वणीच आहे. याआधी जरी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन होतं, तरी ग्रुपमधील कोणताही सदस्य चॅट एक्सपोर्ट करू शकत होता आणि इथेच होतं तुमच्या गोपनीयतेवर घाला घातला जात होता

चॅटिंग इतरांना दिसणे अशक्य :

‘Advanced Chat Privacy’ फीचरमुळे कोणीही तुमचे चॅट्स डिव्हाईसच्या बाहेर जाणार नाही, ही एक प्रकारची डिजिटल सेफ्टी आहे.जी फक्त तुमच्यासाठीच खुली आहे.

कसं कराल हे सुपर फीचर अ‍ॅक्टिव्ह?

1. WhatsApp अपडेट करा: प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून अ‍ॅपचं नवीन वर्जन डाऊनलोड करा.

2. हवं ते चॅट उघडा: ज्या चॅटमध्ये सुरक्षा हवी, तो चॅट सिलेक्ट करा.

3. प्रोफाइलवर टॅप करा: व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या नावावर क्लिक करा.

4. Advanced Chat Privacy ऑन करा: आणि बस्स – आता चॅट्स सेफ!

फ्युचर सिक्युरिटी – स्क्रीनशॉटवरही नजर!

सध्या हे फीचर स्क्रीनशॉट्सला ब्लॉक करत नाही, पण सूत्रांनुसार WhatsApp लवकरच हेही अ‍ॅड करणार आहे. त्याशिवाय, अलीकडील दुसऱ्या अपडेटमुळे आता तुम्ही चॅटमधील हवं तितकं मजकूर हटवू शकता. गोपनीयता म्हणजे अधिकार, आणि WhatsApp आता तो पूर्णपणे मिळणार आहे. या फीचरमुळे WhatsApp ने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, त्यांच्यासाठी वापरकर्त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये