तंत्रज्ञान

Call Recording : सुरवात, वापर, पद्धती आणि कायदेशीर नियम

कॉल रेकॉर्डिंगच्या इतिहासाचा आढावा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील बदल

Published by : Shamal Sawant

आजच्या डिजिटल युगात कॉल रेकॉर्डिंग ही सुविधा सर्वसामान्य वापरात आली असली तरी तिचा इतिहास खूप जुना आहे. स्मार्टफोनचा जमाना सुरू होण्यापूर्वीच, लोकांनी टेलिफोनच्या वायरला टेप रेकॉर्डर जोडून कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. ती एक अव्यावसायिक आणि प्राथमिक पद्धत होती.

कशी झाली कॉल रेकॉर्डिंग सुविधेची सुरुवात?

सुरुवातीला थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे मोबाइलवर कॉल रेकॉर्ड करता येत होते. नंतर मोबाईल कंपन्यांनीच इन-बिल्ट कॉल रेकॉर्डिंग फिचर देण्यास सुरुवात केली. सध्या अनेक कंपन्या फोन सुरू होताच "ही कॉल रेकॉर्ड केली जात आहे" असा ऑडिओ अलर्ट देतात. मात्र काही कंपन्यांनी या सुविधेला मर्यादा घालून ती जवळपास अकार्यक्षम करून टाकली आहे.

नवीन 5G फोन की जुने 4G फोन – कुठे चालते कॉल रेकॉर्डिंग?

आज ५G तंत्रज्ञान येऊनही, अनेक जुने ४G फोन अजूनही कॉल रेकॉर्डिंग व्यवस्थित करू शकतात. नवीन 5G फोन्समध्ये या सुविधेवर बंदी किंवा अडथळे असल्यामुळे, वापरकर्ते अ‍ॅप्स किंवा क्लाउडवर अवलंबून राहतात.

कायद्याअंतर्गत कॉल रेकॉर्डिंग योग्य आहे का?

- भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ नागरिकांना जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो. याच अंतर्गत, स्वतःचा बचाव किंवा न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे मानले जात नाही.

- योग्य सादरीकरण केल्यास कॉल रेकॉर्डिंग न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते.

- कॉलमधील माहितीचं लेखी ट्रान्सक्रिप्शन देणे गरजेचे असते.

- लांब कॉल्सच्या वेळी आवश्यक भाग निवडून संक्षिप्त आणि मुद्देसूद संवाद ठेवणे फायदेशीर ठरते.

कॉल रेकॉर्ड केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

1. रेकॉर्डिंगची मूळ फाइल सुरक्षित ठेवावी.

2. त्यामध्ये कुठलाही बदल न करता जशीच्या तशी जतन करावी.

3. न्यायालयीन प्रक्रिया असेल तर मूळ मोबाइल आणि डेटा उपलब्ध ठेवणे आवश्यक असते.

महत्त्वाच्या टिप्स:

1. कॉल रेकॉर्ड करताना शक्य असल्यास समोरील व्यक्तीची पूर्वसूचना घ्या.

2. प्रायव्हसी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करूनच रेकॉर्डिंग करा.

3. वादग्रस्त कॉल्ससाठी डॉक्युमेंटेशन आणि टाइमस्टॅम्प ठेवा.

कॉल रेकॉर्डिंग ही सुविधा वापरकर्त्यांसाठी प्रभावी ठरू शकते, विशेषतः जेव्हा ती स्वसंरक्षण, साक्ष किंवा तक्रारींसाठी वापरली जाते. मात्र तिचा वापर करताना कायदेशीर चौकटीत राहणे आणि माहितीची गोपनीयता राखणे अत्यावश्यक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला