तंत्रज्ञान

स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कू’ सर्वाधिक ट्रेंडिंग, युजर संख्या १ कोटींच्या पार

Published by : Lokshahi News

स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट 'कू' ची युजर संख्या १ कोटींच्या पार गेली आहे. पुढच्या वर्षात ही संख्या १० कोटींवर नेण्याचे लक्ष ठेवल्याचे कंपनीचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितले. ते म्हणाले, ही अजून सुरुवात आहे. आज इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत फक्त २ टक्के युजर मायक्रोब्लॉगिंगचा वापर करतात. फक्त इंग्रजी पाहिले तर ही संख्या २ टक्के इतकी सिमीत आहे. म्हणजे ९८ टक्के युजर्सना अजून मायक्रोब्लॉगिंग काय याची कल्पना नाही. आणि याच वर्गावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

ट्विटरला स्पर्धा म्हणून कू ची सुरवात झाली असून सुरुवातीचा सव्वा दीड वर्षात युजर संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच ८५ लाख डाऊनलोड झाले आहेत. आज घडीला ७० कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. त्या सर्वांना आम्ही 'तुमच्या मनातील गोष्टी कू वर करू शकता' हे पटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही अप्रमेय म्हणाले.

या प्रवासात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. गतवर्षी हिंदी, तेलुगू, बंगाली सह अन्य भारतीय भाषांचा सपोर्ट कू ला मिळाला आहे. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद झाल्यावर या स्वदेशी डिजिटल मंचाला वाढती मागणी आहे. कू ची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. अनेक केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकारी, सेलेब्रिटी आणि काही परदेशी सरकारे याचा वापर करत आहेत. स्थानिक कायदे आणि नियम पाळून आम्ही व्यवसाय करतो आहोत असेही अप्रमेय यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा