Moto G Stylus 5G Team Lokshahi
तंत्रज्ञान

मोटोरोलाचा नवीन 5G मोबाईल बाजारात; जाणून घ्या फीचर्स..

Published by : Saurabh Gondhali

Motorola नं आपल्या G सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. Moto G 5G (2022) आणि Moto G Stylus 5G (2022) असे दोन डिवाइस अमेरिकन बाजारात आले आहेत. नवीन Moto G 5G (2022) स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 6GB रॅमला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया या हँडसेटची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.  

Moto G 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 700 चिपसेट Mali G57 GPU सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते, जी मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.  Moto G 5G (2022) स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळतो. फ्रंटला 13MP चा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी ओप्शसनसह साईड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. Moto G 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट मिळतो.  

Moto G 5G (2022) स्मार्टफोनचा एकच मॉडेल अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 399.99 डॉलर (सुमारे 30,530 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्रीन आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल पडली बंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

Mono Rail : चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली; प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला पुराचा वेढा; शेकडो गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Update live : चेंबूर भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली; प्रवासी अडकले