Motorola Frontier Team Lokshahi
तंत्रज्ञान

Motorola चा ‘200MP’ कॅमेरासह नवीन मोबाईल येणार..

Motorola Frontier हा नवीन स्मार्टफोन कंपनी 200MP कॅमेऱ्यासह लाँच करणार आहे.

Published by : Saurabh Gondhali

Motorola नं सध्या स्मार्टफोन (Smartphone) मार्केटमध्ये जास्तच आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. कंपनी शाओमी, सॅमसंग, वनप्लस, रियलमी इत्यादी दिग्गज ब्रँड्सना मागे टाकण्याची संधी सोडत नाही आहे. हे गेल्यावर्षी आलेल्या Motorola Edge 30 Pro वरून समजलं आहे, जो जगातील सर्वात वेगवान प्रोसेसरसह (processor) येणारा पहिला फोन होता. आता Motorola Frontier हा नवीन स्मार्टफोन कंपनी 200MP कॅमेऱ्यासह लाँच करणार आहे.  

टीजर्सनुसार Motorola Frontier मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. याचे लक्षवेधी फीचर म्हणजे कॅमेरा सेगमेंट असेल. फोनमध्ये ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 200MP चा मुख्य सेन्सर, 50MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 12MP ची पोर्टेट किंवा टेलीफोटो लेन्स मिळेल. तर फ्रंटला 60MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. 

हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 1+ SoC सह बाजारात येऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळेल. Motorola Frontier मध्ये 4,500mAh ची बॅटरी 125W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह मिळू शकते. लिक्सनुसार हा फोन मे 2022 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.  

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा