Admin
तंत्रज्ञान

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ बनले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ बनले आहेत. सुझन यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. आपले कुटूंब, आरोग्य व काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूट्यूब कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुसान व्होजिकी यांनी दिली आहे.

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नोव्हेंबर 2015 मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती.

नील मोहन कोण आहेत?

नील मोहन यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. नीलने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्याच्या करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांना $60,000 पगार देण्यात आला. याशिवाय नील यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. पुढे त्यांनी DoubleClick Inc मध्ये नोकरी घेतली . नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले. DoubleClick Inc नंतर, त्यांनी 2008 मध्ये Google मध्ये Senior Vice President, Display and Video Ads म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये, त्यांना YouTube चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर बनवण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या