NETFLIX USERS SHOCKED: POPULAR MOVIES AND SERIES TO BE REMOVED BEFORE 2026 
तंत्रज्ञान

Netflix यूजर्सना मोठा धक्का! काही तासांत डिलिट होणार लोकप्रिय चित्रपट आणि सिरीज

Netflix Alert: काही तासांतच अनेक लोकप्रिय हॉलीवूड चित्रपट आणि गाजलेल्या वेब सिरीज नेटफ्लिक्सवरून हटवण्यात येणार असून, प्रेक्षकांना शेवटची संधी मिळाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नेटफ्लिक्सवर बिंज-वॉचिंग करणाऱ्या प्रेक्षकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स २०२६ सुरू होण्यापूर्वीच आपल्या कंटेंट लायब्ररीत मोठा बदल घडवणार असून, अनेक गाजलेले हॉलिवूड चित्रपट, वेब सीरीज आणि टीव्ही शो प्लॅटफॉर्मवरून कायमचे हटवले जातील.

दर आठवड्याला नवीन कंटेंट येत असला तरी जुन्या लोकप्रिय टायटल्सना निरोप देण्याची ही प्रक्रिया सतत चालू असते, पण यावेळी कल्ट क्लासिक्स आणि सुपरहिट फ्रँचायझींचा समावेश असल्याने प्रेक्षकांची निराशा वाढली आहे. या टायटल्ससाठी अंतिम स्ट्रीमिंग डेट १ जानेवारी निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर ते नेटफ्लिक्सवर उपलब्ध राहणार नाहीत.

हा निर्णय कंटेंटचे लायसन्स संपल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मची लायब्ररी रिफ्रेश करण्यासाठी घेतला जात असल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगतात. नेटफ्लिक्स नवीन कंटेंट आणण्यासाठी जुन्या टायटल्स काढून टाकते, ज्यामुळे यावेळी जॅक ब्लॅक, अँजेलिना जॉली, ब्रॅडली कूपर, ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन, डकोटा जॉन्सन आणि मॅट डॅमन यांसारख्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट यादीत सामील झाले आहेत. यापैकी अनेक सिनेमे ऑलटाइम फेव्हरेट मानले जातात आणि बॉक्स ऑफिसवर अब्जावधी डॉलर्सची कमाई केली आहे.

उदाहरणार्थ, क्रुक्ड हाऊस, बेबी ड्रायव्हर, कोच कार्टर, ब्लू बीटल, कॅप्टन फिलिप्स, क्रेझी रिच एशियन्स, डर्टी डान्सिंग, द मार्टियन, टॅक्सी ड्रायव्हर, ट्रेनिंग डे, स्कारफेस, ओशन्स ८, झिरो डार्क थर्टी, डोनी डार्को, रनअवे ब्राइड, द मास्क, हाऊ टू बी सिंगल, घोस्ट, द गुनीज आणि डॉक्टर स्लीप हे चित्रपट लवकरच गायब होणार आहेत. तसेच, कुंग फू पांडा, द हँगओव्हर, फिफ्टी शेड्स, जी.आय. जो, टॉम्ब रेडर आणि मेझ रनर यांसारख्या लोकप्रिय फ्रँचायझीही नेटफ्लिक्सवरून काढल्या जातील.

टीव्ही शो आणि सीरीजच्या बाबतीतही असेच आहे. मिस्टर रोबोट, प्रिझन ब्रेक, लॉस्ट, हाऊस ऑफ लाईज आणि स्टार ट्रेक यांसारख्या गाजलेल्या मालिकाही प्लॅटफॉर्मवरून हटवल्या जातील. जर तुमच्या वॉचलिस्टमध्ये हे टायटल्स अजून बाकी असतील, तर उशीर न करता लगेच बिंज-वॉचिंग सुरू करा, कारण काही तासांतच ते कायमचे निघून जातील. नेटफ्लिक्सच्या या बदलामुळे प्रेक्षकांना पर्यायी प्लॅटफॉर्मकडे वळावे लागेल, पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा बदल नक्कीच चर्चेचा विषय ठरेल.

• १ जानेवारीपासून अनेक लोकप्रिय चित्रपट आणि सिरीज नेटफ्लिक्सवरून हटणार
• लायसन्स संपल्यामुळे कंटेंट काढण्याचा निर्णय
• सुपरहिट फ्रँचायझी आणि कल्ट क्लासिक्सचा समावेश
• वॉचलिस्टमध्ये असलेले टायटल्स तात्काळ पाहण्याचा सल्ला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा