तंत्रज्ञान

Hyundai ची Tucson 27.7 लाखांमध्ये लॉन्च; ADAS ने सुसज्ज असलेली एकमेव कार

Hyundai ने आपली नवीन फ्लॅगशिप SUV कार Tucson लाँच केली आहे. Hyundai ने ही कार ADAS तंत्रज्ञानाने लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात या SUV कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 27.7 लाख रुपये निश्चित केली आहे, तर त्याच्या उर्वरित व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल माहिती मिळणे बाकी आहे. Hyundai ची नवीन Tucson ही चौथ्या पिढीची SUV आहे, जी भारतात दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या दोन्ही ट्रिमला प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशी नावे आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

Hyundai ने आपली नवीन फ्लॅगशिप SUV कार Tucson लाँच केली आहे. Hyundai ने ही कार ADAS तंत्रज्ञानाने लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात या SUV कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 27.7 लाख रुपये निश्चित केली आहे, तर त्याच्या उर्वरित व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल माहिती मिळणे बाकी आहे. Hyundai ची नवीन Tucson ही चौथ्या पिढीची SUV आहे, जी भारतात दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या दोन्ही ट्रिमला प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार मोठ्या लांब व्हीलबेससह लॉन्च करण्यात आली आहे तर इतर देशांमध्ये ती लहान व्हीलबेससह लॉन्च करण्यात आली आहे. नवीन Tucson ही Hyundai ची पहिली SUV आहे जी फीचर लेव्हल 2 ADAS सह लॉन्च केली गेली आहे. ही नवीन एसयूव्ही थेट जीपच्या कंपास, सिट्रोएन सी5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगनच्या टिगुआनशी स्पर्धा करेल.

Hyundai आपली नवीन Tucson 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लॉन्च करणार आहे.

कंपनीने या कारमध्ये तेच इंजिन वापरले आहे, जे अल्काझारमध्ये वापरले आहे.

पेट्रोल कार 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च केली जात आहे. डिझेल कारबद्दल बोलायचे झाले तर यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

डिझाइनच्या बाबतीत ह्युंदाईने नवा प्रयोग केला आहे. त्याच्या ग्रिलमध्येच हेडलाइट्स देण्यात आले आहेत.

टॉप डिझेल व्हेरियंटमध्ये मल्टी-टेरेन मोड (बर्फ, चिखल आणि वाळू) पर्यायासह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते.

Hyundai ने जागतिक स्तरावर कंपनीने स्वीकारलेल्या स्पोर्टिनेस डिझाइनमध्ये नवीन Tucson सादर केले आहे.

नवीन मॉडेलचा व्हीलबेस सध्याच्या मॉडेलपेक्षा 85 मिमी लांब आहे.

कारच्या मागील बंपरमध्ये डायमंड पॅटर्न फिनिशिंग असून फॉक्स स्किड प्लेट देण्यात आली आहे.

नवीन टक्सनला रुफ स्पॉयलर मिळतो, जो मागील वॉशर आणि वाइपर दाखवून देत नाही.

ग्राहकांना ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ मिळतात.

ग्राहकांना ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ मिळतात.

मनोरंजनासाठी, नवीन टक्सनला 8 बोस साउंड सिस्टम, व्हॉईस कमांड, अलेक्सा आणि गुगल असिस्टंटसाठी सपोर्ट मिळतो.

Hyundai ने त्यात एअर प्युरिफायर, सीड ऍडजस्टमेंट, रेन सेन्सिंग वायपर्स, 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप