next@acer
next@acer  Team Lokshahi
तंत्रज्ञान

Next@Acer चा ग्लोबल इव्हेंट, हे आहेत नवीन गॅजेट्स...

Published by : Team Lokshahi

लॅपटॉप-कॉम्युटर (Laptop-commuter) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसरचा नुकताच next@acer हा ग्लोबल मेगाइंव्हेंट पार पडला. यात नवनवीन गॅजेट्स लॉन्च (Gadgets launch) करण्यात आले. येच्या जुलैमध्ये ही नवी गॅजेट्स अमेरिकेच्या बाजार पेठात उपलब्ध होतील नंतर काही दिवसातचं भारतातही उपलब्ध होतील.

ACER SWIFT 3 OLED

हा लॅपटॉप 14 इंची OLED डिस्प्ले, जवळपास 92 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशोसह लॉन्च झाला. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा लॅपटॉप 12th Gen Intel Core H-series प्रोसेसर आणि Intel Iris® Xe ग्राफिक्सने सुसज्ज आहे. अवघ्या 17.9 मिलिमीटरच्या अल्युमिनिअस चेसिसमुळे लॅपटॉपचे वजन हे केवळ 1.4 किलो आहे. त्यामुळे हा लॅपटॉप वापरायला अगदी सोपा आहे.

Acer Travel Mate Laptops

एसरने या सिरीजमध्ये Travel Mate P4 आणि Travel Mate Spin P4 हे बिझनेस श्रेणीतील दोन लॅपटॉप लॉंन्च केले. Travel Mate P4 हा लॅपटॉप 14 आणि 16 इंची व्हेरियंटमध्ये लॉन्च झाला असून यामध्ये 16:10 अस्पेक्ट रेशोसह IPS डिस्प्ले दिला आहे.

Predator Helios 300 Spatial Labs

खास गेमिंगसाठी एसरने प्रीडेटर श्रेणीमध्ये Predator Helios 300 Spatial Labs ही नवीकोरी लॅपटॉप सीरिज लॉन्च केली आहे. गेमिंगचा गत करण्यासाठी यामध्ये 12th Gen Intel® Core™ i9 प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce RTX™ 3080 ग्राफिक्स देण्यात आले आहे. त्याशिवाय प्रीडेटर श्रेणीत Predator Triton 300 SE हा लॅपटॉप, Predator XB273K LV and Acer Nitro XV272U RV हे दोन गेमिंग मॉनिटरही सादर केले.

Aspire Vero Laptops

एसरने (Acer) अस्पायर व्हेरो सीरिजमध्ये 14 इंची आणि 15 इंची फुल एचडी डिस्ल्पे असलेले दोन लॅपटॉप लॉन्च केले. दोन्ही लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel® Core™ प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये दिलेला फुल एचडी कॅमेरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाइन एज्युकेशनसाठी फायदेशीर ठरतो.

याशिवाय व्हेरो सीरिजमध्ये एसरने व्हेरो मॉनिटर्स, व्हेरो प्रोजेक्टर, तसेच व्हेरो किबोर्ड आणि माऊसही लॉन्च केले आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉपमध्ये Intel® Iris® Xe ग्राफिक्स आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी आहे. त्याशिवाय यामध्ये Type-C चे चार आणि USB 3.2 Gen1 Type-A चे दोन पोर्टस दिले आहे. त्यामुळे लॅपटॉप बंद असतानाही त्यावरून मोबाईल सहजपणे चार्ज करता येतो.

Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

"हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील", नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका