तंत्रज्ञान

Nokiaचा नवा लोगो बघितला का? 60 वर्षात पहिल्यांदा बदलला लोगो

Published by : Siddhi Naringrekar

नोकियाने गेल्या 60 वर्षांत प्रथमच आपला लोगो बदलला आहे. कंपनी नवीन लोगोसह बाजारात जोरदार पुनरागमन करण्याची योजना आखत असल्याचे हे एक मोठे चिन्ह आहे. नोकियाच्या नवीन लोगोमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत, जे मिळून NOKIA हा शब्द बनवत आहेत. यावेळी लोगो रंगांच्या बाबतीत खूपच चांगला आहे. पूर्वी तो फक्त निळा असायचा, पण नवीन लोगो अनेक रंगांनी बनलेला आहे. असे कंपनीकडून सांगण्यात आले.

Nokia ने नुकताच Nokia G22 स्मार्टफोन लॉन्च केला. या मोबाईल फोनचे मागील कव्हर 100% रिसायकल प्लास्टिकपासून बनवले आहे. Nokia G22 ची बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट ग्राहक घरबसल्या निश्चित करू शकतात. यासाठी कंपनी तुम्हाला मोबाईल फोनसोबत iFixit किट मोफत देत आहे. या किटच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनचा कोणताही भाग सहज बदलू शकता.

Nokia G22 मध्ये तुम्हाला 6.52 इंच HD Plus डिस्प्ले मिळेल जो 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोबाईल फोन 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत सुमारे 15,500 रुपये आहे. फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, तर फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल फोन 5000 mAh बॅटरीसह येतो जो 20W चार्जिंगला सपोर्ट करतो.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...