तंत्रज्ञान

NOKIAचा दमदार Smartphone लॉन्च

Published by : Lokshahi News

NOKIAने दमदार Smartphone लॉन्च केला आहे. एचएमडी ग्लोबलने 3 नवे स्मार्टफोन आणि एक नवा ऑडीयो पोर्टफोलियो लॉन्च केला आहे. कंपनीने नोकियो एक्सआर 20 (Nokia XR 20) , नोकिया 6310 (Nokia 6310) आणि नोकिया सी 30 (Nokia C30) हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या तिघांपैकी नोकिया सी30 हा सर्वात धमाकेदार मोबाईल समजला जात आहे. Nokia C30 मध्ये दमदार बॅटरी बॅकअप आणि मोठी स्क्रीन आहे. या स्मार्टफोनचा लूकही शानदार आहे. हा मोबाईल एकदा चार्जिंग केल्यास 3 दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे. या नोकिया सी 30 ची किंमत आणि फीचर्स किती आहे, हे जाणून घेऊयात.

Nokia C30 चे फीचर्स
Nokia C30चा डिस्प्ले हा 6.82 इंच एचडी प्लस आहे. या स्मार्टफोनचे एकूण 3 व्हेरीएंट आहेत. यापैकी 2 मोबाईलची इंटरनल स्टोरेज 32 जीबी इतकी आहे. स्टोरेज लिमीट 256जीबी पर्यंत वाढवता येईल. हा मोबाईल Android 11 या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे. विशेष म्हणजे यामध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला तगडा बॅटरीबॅकअप देण्यात आलाय. या स्मार्टफोनची बॅटरी ही 6000mAH इतकी आहे.स्मार्टफोन ग्रीन आणि व्हाईट रंगात उपलब्ध आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी