तंत्रज्ञान

आता इन्स्टाग्रामवरही मिळणार Repost पर्याय, जाणून घ्या हा पर्याय कसा काम करेल

मेटा कंपनी इन्स्टाग्राम अॅप सुधारण्यासाठी आणि वापरकर्त्यांसाठी अॅप अधिक मनोरंजक बनवण्यासाठी सतत काम करत आहे. लवकरच Instagram चे एक नवीन अपडेट येत आहे ज्यामध्ये आपण Instagram च्या पोस्ट पुन्हा पोस्ट करु शकतो. इंस्टाग्रामनेही या फीचरची चाचणी सुरू केली आहे. ज्या प्रकारे तुम्ही ट्विटरवर कोणाचेही ट्विट रिट्विट करू शकता, त्याचप्रमाणे हे फीचर इंस्टाग्रामवर देखील उपलब्ध असेल.

Published by : Siddhi Naringrekar

हे फीचर फेसबुकवर आधीपासूनच आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या टाइमलाइनवर इतर यूजर्सच्या पोस्ट शेअर करू शकता. इंस्टाग्रामने या फीचरसोबत आणखी काही अपडेट्स जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामने म्हटले आहे की ते एक फीचर तयार करत आहेत ज्यामध्ये पोस्ट पुन्हा पोस्ट किंवा शेअर केली जाऊ शकते म्हणजेच रिपोस्ट. आणि ज्याची पोस्ट आपण रिपोस्ट करणार आहोत त्यालापण याचे क्रेडिट मिळेल.

Instagram ने पुष्टी केली आहे की ते काही निवडक वापरकर्त्यांसह या रीपोस्ट वैशिष्ट्याची चाचणी घेत आहेत. परंतु मेटाने अद्याप आपल्या बाजूने कोणतीही माहिती अधिकृत केलेली नाही. इंस्टाग्रामने काही प्रायव्हसी फीचरमध्ये बदल केले आहेत. आता १६ वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्रामवर संवेदनशील मजकूर पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

आजचा सुविचार