तंत्रज्ञान

Ola S1 Air electric scooter: ओला ने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने दिवाळीअगोदर एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

Published by : shweta walge

इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने दिवाळीअगोदर एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला Ola S1 Air असे नाव देण्यात आले आहे. कंपनीच्या Ola S1 स्कूटरची ही परवडणारी वर्जन आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला 100KM पेक्षा जास्त रेंज मिळणार आहे. स्कूटर 999 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त कंपनीने या स्कूटरवर 5 हजार रुपयांची सूट देत ​​आहे.

किंमत आणि बुकिंग

नवीन 2022 Ola S1 Air व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे कंपनीच्या OLA S1 पेक्षा 20,000 रुपये आणि S1 Pro पेक्षा 50,000 रुपये स्वस्त आहे. मात्र, ही किंमत खास दिवाळीसाठी असून 24 ऑक्टोबरपर्यंत वैध आहे. यानंतर किंमत 84,999 रुपये होईल. हे 999 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केले जाऊ शकते. स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सुरू होईल.

बॅटरी आणि रेंज

नवीन Ola S1 Air मध्ये 2.5 kWh बॅटरी पॅक आहे. याला 101KM ची ARAI-सर्टिफाइड रेंज मिळेल. जरी वास्तविक जगात 76 किमी. रेंजचा दावा केला जात आहे. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ते फक्त 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवते. स्कूटरसोबत 500W पोर्टेबल चार्जर देण्यात आला आहे, ज्याद्वारे ती 4.5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

फीचर्स

या स्कूटरला कंपनीच्या बाकीच्या मॉडेलपेक्षा थोडे वेगळे डिझाइन देण्यात आले आहे. यात ड्युअल-टोन पेंट फिनिश, नवीन रीअर ग्रॅब हँडल्स आणि अपडेटेड सिंगल-सीटसह नवीन फ्लॅट फूटबोर्ड मिळतो. याशिवाय स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड, साइड स्टँड अलर्ट, इको आणि स्पोर्ट्स मोड, म्युझिक प्लेबॅक आणि 34 लीटर बूट स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय