One Plus Team Lokshahi
तंत्रज्ञान

‘One Plus’ चा आणखी एक मोबाईल भारतात होतोय लॉन्च, जाणून घ्या फिचर

Published by : Saurabh Gondhali

OnePlus Nord 2T मोबाइल काही दिवसांपूर्वी युरोपमध्ये सादर करण्यात आला होता. आता हा फोन भारतात लाँच होत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. OnePlus Nord 2T 5G भारतात 19 मेला लाँच होणार आहे. एका ऑनलाईन इव्हेंटमधून हा डिवाइस भारतात येईल. या इव्हेंटच थेट प्रक्षेपण 19 मेला संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून वनप्लसच्या युट्युब चॅनलवर करण्यात येईल.  

OnePlus Nord 2T चा एकच व्हेरिएंट युरोपमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तिथे याची किंमत 399 यूरो (सुमारे 32,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतीय किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या आत असू शकते. 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन नॉर्ड सीरिजमधील सर्वात प्रीमियम डिवाइस आहे. त्यामुळे यात अनेक स्पेक्स अपग्रेड करण्यात आले आहेत. हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येतो. जो पंच होल डिजाईनसह 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डिमेन्सिटी 1300 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB मेमरी मिळते.  

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर