Bank Fraud | Bank Fraud Complaint | Cyber Crime
Bank Fraud | Bank Fraud Complaint | Cyber Crime  team lokshahi
तंत्रज्ञान

Bank Fraud : ऑनलाइन किंवा बँक फसवणूक झाल्यास; 'या' नंबरवर करा काॅल त्वरित मिळतील पैसे

Published by : Shubham Tate

Bank Fraud : ऑनलाइन बँकिंग (Online Banking) आल्यानंतर अनेक फसवणुकीचे (Fraud) प्रकारही समोर येऊ लागले आहेत. अशा सर्व फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जाणीव झाल्यानंतरही काही वेळा तुमची फसवणूक झाली, तर तुम्ही तक्रार क्रमांकावर कॉल करून तुमचे पैसे परत मिळवू शकता. एवढेच नाही तर या क्रमांकावर कॉल केल्यास फसवणुक दारांविरुद्ध तातडीने कारवाई सुरू केली जाईल. (online fraud or bank fraud dial these 6 numbers immediately you will get the money back)

ऑनलाइन फसवणुकीसाठी हेल्पलाइन क्रमांक

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. यामुळेच काही वेळापूर्वी १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला होता. ही हेल्पलाइन एक प्रकारे व्हर्च्युअल पोलिस स्टेशनप्रमाणे काम करते, पण लक्षात ठेवा की या नंबरवर कॉल करण्यापूर्वी तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीशी संबंधित सर्व माहिती तुमच्याकडे असायला हवी. यानंतर तुम्ही तुमची तक्रार या क्रमांकावर नोंदवू शकता.

स्थानिक पोलीस माहिती गोळा करतील

ही हेल्पलाइन भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे आरबीआय, पेमेंट बँका आणि इतर प्रमुख बँकांच्या मदतीने चालवली जाते. एवढेच नाही तर याबाबत तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाईही सुरू केली जाते. सोबतच पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली आहे. तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती तपास यंत्रणेला देणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे.

गृह मंत्रालयाचे प्रकरणांवर थेट लक्ष

या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे ही थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Home Ministry) देखरेखीखाली सुरू करण्यात आली. गृहमंत्रालयही यावर लक्ष ठेवते. अनेकांच्या तक्रारीनंतर पैसे परत केले जातात. तक्रार केल्यानंतर काही तासांत पीडितांच्या मोबाईल नंबरवर पोचपावती क्रमांकही पोहोचतो.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...