काही दिवसांपूर्वी मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस म्हणजेच MWC 2022 मध्ये ओप्पो कंपनीने चक्क 240W ने फास्ट चार्जिंग करणारं SuperVOOC तंत्रज्ञान जगासमोर आणलं असून याद्वारे 4500mAh बॅटरी असलेला एक फोन अवघ्या 9 मिनिटात 100 चार्ज होऊ शकतो!
या तंत्रज्ञानाने 4500mAh ची बॅटरी फक्त साडेतीन मिनिटात 50 टक्के चार्ज होईल. हे तंत्रज्ञान सध्या प्रायोगिक अवस्थेत असून लगेचच बाजारातील फोन्समध्ये उपलब्ध होणार नाही. बॅटरी कशाप्रकारे काम करेल हे स्पष्ट असलं तरी बॅटरी किती लवकर खराब होईल हे मात्र यावेळी सांगण्यात आलेलं नाही.
ओप्पोच्याच सहकारी कंपन्या असलेल्या वनप्लस आणि रियलमीनेही 150W चं UltraDart चार्जिंग आणलं आहे जे 4500mAh ची बॅटरी 5 मिनिटात ५० टक्के चार्ज करू शकतं. हे तंत्रज्ञान या वर्षी सादर होणाऱ्या पुढील फोन्समध्ये समाविष्ट केलं जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं आहे.
Realme GT Neo 3 हा शक्यतो हे तंत्रज्ञान असलेला पहिला फोन असेल. या अतिवेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासाठी कंपन्या त्यांच्या फोन्समध्ये एक ऐवजी दोन बॅटरीचा वापर करतात. त्यांना ओव्हरचार्जिंगपासून संरक्षण मिळावं म्हणून खास PCB चा समावेश असतो. त्यासाठी स्मार्ट बॅटरी हेल्थ अल्गॉरिथम वापरला जातो ज्यामुळे याची कामगिरी सुधारते आणि बॅटरी टिकण्याचा कालावधी वाढेल.