तंत्रज्ञान

आता बंद करा Corona Caller Tune

Published by : Lokshahi News

मागील दीड वर्षापासून संपूर्णजग भरात कोरोनाची परिस्थिती आहे. सरकारकडून कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय, त्यानंतर लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. फोनवरुनही कॉलर ट्यूनच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली जात आहे. एखाद्याला फोन केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची कॉलर ट्यून, लसीकरणाबाबतची कॉलर ट्यून ऐकू येते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनही होती. ती काही दिवसांनी हटवण्यात आली. कोरोना काळात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोबाईलवर Corona Caller Tune ऐकू येत होती.

परंतु काही काळापासून ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबतही काही जण चर्चा करत आहेत. एका ट्रिकद्वारे ही ट्यून बंद करता येऊ शकते. BSNL – बीएसएनएल (BSNL) चे प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्स कोरोना व्हायरस ट्यून मोबाईलवर बंद करू शकतात. त्यासाठी UNSUB टाईप करुन 56700 या किंवा 56799 वर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. Jio – जिओ (Jio Users) युजर्स आपल्या फोनवरुन STOP लिहून 155223 वर मेसेज करु शकतात. कन्फर्मेशननंतर कॉलर ट्यून बंद होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी