recharge plan | BSNL team lokshahi
तंत्रज्ञान

रिचार्जचं टेन्शन संपलं, आता 228 रुपयांत सिम वर्षभर चालणार

फोन रिचार्जवर जास्त खर्च करण्याचे टेन्शन संपले

Published by : Shubham Tate

recharge plan : जर तुम्ही दोन सिम वापरत असाल आणि एक सिम फक्त फोन रिसीव्ह करण्यासाठी अॅक्टिव्ह ठेवू इच्छित असाल, तर साहजिकच तुम्हाला तो रिचार्ज करण्यासाठी जास्त खर्च करायचा नाही. ज्यामध्ये तुमचे सिम फक्त 228 रुपयांच्या रिचार्जमध्ये वर्षभर रिचार्ज होईल. ही सुविधा बीएसएनएलची आहे. (plan for mobile bsnl rs 19 affordable plan with 30 days validity check benefits)

BSNL ने 19 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. 19 रुपयांच्या रिचार्जची वैधता 30 दिवसांसाठी असेल. जर तुम्हाला तुमचे सिम 12 महिने चालु ठेवायचे असेल, तर तुम्हाला 19 पट म्हणजेच 228 रुपये खर्च करावे लागतील. या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. वापरकर्ता 20 पैसे प्रति मिनिट दराने नेट किंवा ऑफ नेटवर कॉल करू शकतो.

हे रिचार्ज सर्व राज्यांमध्ये वैध नसले तरी. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. 19 रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजर्सला 3G सेवा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 4G सेवा मिळणार नाही. इतर सेवा कंपन्या सिम चालु ठेवण्यासाठी दरमहा किमान 50 ते 150 प्रीपेड योजना देत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा