Mobile Team Lokshahi
तंत्रज्ञान

Realme GT 2Pro वर धमाकेदार ऑफर..

5 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध

Published by : Saurabh Gondhali

Realme GT 2 Pro स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही फ्लॅगशिप चिपसेट असलेला स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याचा विचार करत असाल तर या फोनची निवड करू शकता. हा फोन कंपनीच्या वेबसाईटवरून सेल अंतर्गत 5 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होईल.  

फोनचा 8 जीबी रॅम असलेला व्हेरिएंट 49,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर 12 जीबी रॅम मॉडेलसाठी 57,999 रुपये मोजावे लागतील. परंतु या ऑफर अंतर्गत कंपनीच्या वेबसाईटवर आज तुम्ही 5 हजार रुपयांची सूट मिळवू शकता. ही ऑफर प्रीपेड ऑफर्सवर उपलब्ध आहे. म्हणजे कॅश व डिलिव्हरी ऑफर्सवर हा डिस्काउंट मिळणार नाही.  

शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा