Realme's upcoming Phone 
तंत्रज्ञान

रियल मीचा नवीन फोन लवकरच मार्केटमध्ये…

Published by : Vikrant Shinde

REALME मी या कंपनीने आपला नवा फोन रियल मी 9 4G हा लवकरच बाजारामध्ये येत असल्याचे जाहीर केले आहे. हा REALME 9 4G फोन 7 एप्रिल 2022 रोजी बाजारात येत असल्याचे सांगितले. रियल मी ह्या कंपनीने ही माहिती आपल्या ट्विटर हँडर वरून ट्वीट करून दिली आहे. हा मोबाईल फोन 7 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता लॉन्च होईल.

Realme 9 4G स्मार्टफोन नवीन सॅमसंग सेन्सरसह सादर केला जाईल. यामध्ये सॅमसंगचा 108MP ISOCELL HM6 इमेज सेन्सर दिला जाऊ शकतो. Realme 9 सीरीज स्मार्टफोन अंतर्गत Realme 9i, Realme 9 5G स्पीड एडिशन, Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोन Realme ने लॉन्च केले आहेत. आता कंपनी त्याच सीरीजचा नवीन स्मार्टफोन Realme 9 4G लॉन्च करणार आहे.

एका रिपोर्टनुसार, Realme 9 4G स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सपोर्टसह येईल. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 90Hz असेल. Realme 9 4G स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज सपोर्टसह सादर केला जाईल. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा