Reemi 10 Power  Team Lokshahi
तंत्रज्ञान

जाणून घ्या Reemi 10 Power या नवीन स्मार्ट फोन विषयी ...

रेडमी 10 पावर आता कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल

Published by : Saurabh Gondhali

Xiaomi नं या महिन्याच्या सुरुवातीला एक शानदार स्मार्टफोन आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत सादर केला होता. Redmi 10 Power मध्ये 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh ची मोठी बॅटरी असे स्पेक्स मिळतील हे सांगण्यात आलं होतं. परंतु हा फोन खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल हे मात्र सांगण्यात आलं नव्हता. आता Redmi 10 Power खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.  

रेडमी 10 पावर आता कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. या बजेट स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. याची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Redmi चा नवीन स्मार्टफोन स्पोर्टी ऑरेंज आणि पावर ब्लॅक रंगात विकत घेता येईल.  

रेडमी 10 पावर स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल वॉटरड्रॉप नॉचसह येतो. फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो. यात 8GB RAM सोबत 3 जीबी एक्सपांडेबल रॅम मिळतो, त्यामुळे एकूण 11 जीबी रॅम होतो. सोबत 128GB स्टोरेज आहे.  

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी