तंत्रज्ञान

रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! JioBook लॅपटॉप 15799 रुपयांना लॉन्च

रिलायन्स जिओने अखेर भारतात आपला पहिला बजेट लॅपटॉप लॉन्च केला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या Jio ने आपला पहिला JioBook लॅपटॉप स्वस्त दरात आणि मोठ्या स्क्रीनसह उपलब्ध करून दिला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रिलायन्स जिओने अखेर भारतात आपला पहिला बजेट लॅपटॉप लॉन्च केला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या Jio ने आपला पहिला JioBook लॅपटॉप स्वस्त दरात आणि मोठ्या स्क्रीनसह उपलब्ध करून दिला आहे. हा लॅपटॉप अॅप सपोर्टसह येतो. JioBook लॅपटॉप Windows वर चालत नाही आणि Android सॉफ्टवेअरसह येतो.

Jio चा हा लॅपटॉप पहिल्यांदा GeM वेबसाइटवर 19,500 मध्ये लिस्ट झाला होता. मात्र, आता हा लॅपटॉप कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँक ऑफरसह JioBook रु. 15000 पेक्षा कमी किमतीत मिळू शकते. रिलायन्सने देशात एकाच स्टोरेज प्रकारात JioBook लाँच केले आहे. या एंट्री-लेव्हल लॅपटॉपमध्ये 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा लॅपटॉप Android च्या वेगळ्या आवृत्तीसह येतो. विंडोज लॅपटॉपच्या तुलनेत अॅप्स जड आणि आकाराने मोठे नसतील.

भारतात JioBook ची किंमत 15,799 रुपयांपासून सुरू होते. हा लॅपटॉप Axis, Kotak, ICICI, HDFC, AU, Indus IND, DBS, YES आणि इतर मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड्सने खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळेल. फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Jio चा लेटेस्ट लॅपटॉप 11.6 इंच डिस्प्ले सह येतो. स्क्रीन 1366 x 768 पिक्सेलचे HD रिझोल्यूशन देते. लॅपटॉपच्या स्क्रीनच्या आजूबाजूच्या कडाही फारशा जाड नसतात.

JioBook लॅपटॉप कंपनीच्या JioOS वर चालतो जो शक्तिशाली हार्डवेअरसह नसलेल्या बजेट उपकरणांमध्ये उत्कृष्ट कार्यप्रदर्शन देण्यासाठी खास ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे. जिओचा हा लॅपटॉप विंडोजवर चालत नाही पण मायक्रोसॉफ्टने यात अॅप्ससाठी सपोर्ट दिला आहे. वापरकर्त्यांना JioBook थर्ड-पार्टी अॅप्स डाउनलोड करण्यासाठी JioStore प्री-इंस्टॉल केले जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?