सॅमसंग कंपनीचा नवीन Samsang Galazy S20 FE 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.
खास वैशिष्ट्ये :
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येतो.हा फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटसह येतो.
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले FHD+सुपर अमोल्ड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले मिळणार आहे.
जो 120Hz चा रिफ्रेश रेट आणि पंच होल कट आऊटसह येतो. तसेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला आहे.
जो 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढविता येऊ शकते.
स्मार्टफोनमध्ये 12MP वाइड अँगल कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8MP चा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे.
दरम्यान, हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 8000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याने हा स्मार्टफोन 47,999 रुपयांत मिळत आहे.