Bank | SBI  Team Lokshahi News
तंत्रज्ञान

बॅंक शाखेत व्यवस्थित माहिती देत नाहीत? मग नोंदवा इथं तक्रार

तक्रार कशी नोंदवायची?

Published by : Team Lokshahi

SBI : बँकिंग क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच बदल झाले आहेत. मात्र असे असतानाही ग्राहकांना अनेक वेळा खाते उघडण्यापासून ते इतर सुविधांपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आरामात काही मिनिटांत तुमची तक्रार नोंदवू शकता. याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया- (sbi register complaint within minutes if branch not respond well)

राज सिंह नावाच्या व्यक्तीने ट्विट करून लिहिले की, 'शाखेतील आतापर्यंतचा सर्वात वाईट अनुभव. खाते उघडणे असो वा अन्य काम असो, एकतर अधिकारी इतरांवर चर्चा पुढे ढकलत होते. लक्ष देत नव्हते. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 'गैरसोयीबद्दल क्षमस्व' असे उत्तर आले आणि बँकेने राज यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला.

तक्रार कशी नोंदवायची?

ग्राहक त्यांच्या तक्रारी https://crcf.sbi.co.in/ccf/ वर नोंदवू शकतात.

ग्राहक वैयक्तिक विभाग किंवा वैयक्तिक ग्राहक विभागाद्वारे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

याशिवाय, ग्राहक त्यांच्या तक्रारी 1800 1234, 18000 2100, 1800 112211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 या टोल फ्री क्रमांकांवर नोंदवू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा