Admin
Admin
तंत्रज्ञान

भारतातील पहिलं अॅपल स्टोअर आजपासून मुंबईत सुरु होणार

Published by : Siddhi Naringrekar

Apple ने अलीकडेच मुंबईतील Jio World Drive Mall मध्ये आपले पहिले स्टोअर घोषित केले आहे, जे आज 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबईनंतर आता अॅपलने देशाची राजधानी नवी दिल्लीत आपले स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. Apple ने म्हटले आहे की Apple Store 20 एप्रिल रोजी दिल्ली येथे सुरू होणार आहे. या दोन्ही अॅपल स्टोअरमध्ये अॅपलची सर्व प्रकारची उत्पादने पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल.

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअर सुरु होणार आहे. हे अॅपल स्टोअर 20 हजार 806 चौरस फुटांचं आहे, ज्याचे भाडे 42 लाख रुपये प्रति महिना आहे. अॅपल स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी अॅपलचे सीईओ टिम कुक सोमवारी भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली.

भारतातील सर्व अॅपल स्टोअर्सवर रंगीत कलाकृती पाहायला मिळतील. याशिवाय विविध उत्पादनांचे तज्ज्ञही या स्टोअर्समध्ये उपस्थित राहणार आहेत. स्टोअरच्या लॉन्चच्या अगोदर, Apple ने त्यांच्या वापरकर्त्यांना कस्टम Apple BKC आणि Apple Saket वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आमंत्रित केले आहे.

अॅपलच्या वेबसाइटनुसार, स्टोअर सोमवारी बंद असेल आणि मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत खुले असेल.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा