तंत्रज्ञान

'या' व्यक्तीने आयफोन 14 प्रो खरेदी करण्यासाठी गाठली दुबई

Published by : Siddhi Naringrekar

Apple ने नुकतीच iPhone 14 सीरीज लाँच केली. 16 सप्टेंबरपासून भारतात त्याची विक्री सुरू झाली आहे. आयफोनची वेगळीच क्रेझ आहे. ही क्रेझ कोची येथील धीरज पल्लीयल या व्यावसायिकानेही दाखवली आहे. आयफोन 14 प्रो खरेदी करण्यासाठी तो दुबईला पोहोचला. 40,000 रुपये खर्च करून तो विमानाने दुबईला पोहोचला आणि नंतर लांब रांगेत उभे राहून आयफोन 14 प्रो खरेदी करण्यात यशस्वी झाला. त्याने iPhone 14 Pro चे 512GB व्हेरिएंट विकत घेतले आहे.

यासाठी त्याला सुमारे 1,29,000 रुपये खर्च करावे लागले. आयफोन खरेदी करण्यासाठी दुबईला जाण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार सलग चौथ्यांदा तो विक्रीच्या पहिल्या दिवशी नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी दुबईला पोहोचला. याच्या आधी तो 2017 मध्ये पहिल्यांदाच आयफोन 8 खरेदीसाठी दुबईला गेले होते. त्यानंतर तो पहिल्याच दिवशी दुबईला जाऊन iPhone 11 Pro Max, iPhone 12 आणि iPhone 13 विकत घेतला. धीरज पल्लीयल याने हा फोन दुबईच्या प्रीमियम रिसेलर मिर्डिफ सिटी सेंटरकडून खरेदी केला आहे.

याने गडद जांभळा कलर व्हेरिएंट विकत घेतला आहे. भारतात त्याची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरू होते. तर 512GB व्हेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 1,29,000 रुपयांना फोन विकत घेण्याव्यतिरिक्त त्यांनी व्हिसा आणि फ्लाइटसाठी सुमारे 40,000 रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना iPhone 14 Pro च्या 512GB व्हेरिएंटसाठी 169,900 रुपये खर्च करावे लागले. या फोनमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि कार क्रॅश डिटेक्शन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमुळे नेटवर्कशिवायही आपत्कालीन कॉल करता येतात. मात्र, ही सुविधा भारतात उपलब्ध नाही.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण