Ola Team Lokshahi
तंत्रज्ञान

भारतामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 'या' आहेत इलेक्ट्रीक स्कूटर्स

Published by : Rajshree Shilare

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत सतत वाढ होत आहे. बाजारात दाखल झालेल्या नवनवीन कंपन्या, त्यांची विविध मॉडेल्स तसेच तंत्रज्ञानामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बाजारपेठ वेगाने वाढत आहे. मार्च 2022 मध्ये, इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत 795% वाढ झाली आहे. मार्च 2021 मध्ये 1,622 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात ई-स्कूटरची एकूण विक्री 14,523 युनिट्स होती.पाहू कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

सेगमेंटमधील मार्केट लीडर बेंगळुरूस्थित (banglore) ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आहे. ओलाने मार्च २०२२ मध्ये ९,१२७ स्कूटर(Scooter) विकल्या आहेत. सध्या या सेगमेंटमधील 62.85% मार्केट शेअर या कंपनीचा आहे. Ola ने देखील आपल्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे.

Ether Energy

एथर एनर्जी (Ether Energy) दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने 2,591 गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एथरने 1,177 युनिट्सची विक्री केली होती. अशा प्रकारे, कंपनीने वर्षभरात 120 टक्के वाढ नोंदवली आहे. या कंपनीचा इलेक्ट्रीक स्कूटरच्या बाजारातील हिस्सा 17.84% आहे. कंपनी Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर विकते, जी पूर्ण चार्ज केल्यावर 116 किमी पर्यंत चालते.

TVS iQube

TVS iQube या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्कूटरची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 406 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात . या स्कूटरच्या 1799 युनिट्सची विक्री झाली आहे.

Bajaj

या यादीमध्ये बजाज चेतक स्कूटर चौथ्या स्थानावर आहे. बजाज(Bajaj) चेतकने गेल्या महिन्यात 1,006 युनिट्सची विक्री केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा