tvs new electric scooter
tvs new electric scooter team lokshahi
तंत्रज्ञान

TVS घेऊन येतेय धासू इलेक्ट्रिक स्कूटी, सिंगल चार्जमध्ये उत्तम मायलेज

Published by : Shubham Tate

tvs new electric scooter : TVS मोटर कंपनी देशात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन स्कूटरचे मॉडेल सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. TVS ची नवीन स्कूटर Creon वर आधारित असू शकते, जी कंपनीने 2018 ऑटो एक्सपोमध्ये लाॅन्च केली होती. TVS बंगलोरमध्ये क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी करत आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत. TVS ची ही भारतातील दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असेल. यापूर्वी कंपनीने TVS iQube आणले होते. TVS च्या नवीन स्कूटरची रेंज iqube पेक्षा चांगली असेल असे बोलले जात आहे. (tvs new creon based electric scooter start testing for first time features and range)

नवीन स्कूटरचा लूक शार्प असेल

सध्या TVS iqube स्कूटरची विक्री चांगली होत आहे. जुलै महिन्यात 4258 मोटारींची विक्री झाली. रिपोर्ट्सनुसार, आगामी TVS इलेक्ट्रिक स्कूटरचे काही घटक iQube सारखे असतील. तसेच, हे मॅक्सी स्कूटर सेगमेंटमध्ये येऊ शकते. TVS Creon चा लूक शार्प असेल आणि यात मोठा टचस्क्रीन पॅनल दिला जाऊ शकतो.

अनेक उत्तम फीचर्स मिळतील

नवीन TVS इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत. अहवाला पाहिला तर, कंपनी TVS Creon आधारित स्कूटरमध्ये 12kW इलेक्ट्रिक मोटरसह तीन लिथियम-आयन बॅटरी देऊ शकते. कंपनीचा म्हणणं आहे की स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमी पेक्षा जास्त प्रवास करू शकते. स्कूटरमध्ये स्टेप-अप सीट डिझाइन, इंटिग्रेटेड ग्रॅब रेल आणि आयताकृती रिअर व्ह्यू मिरर दिसू शकतात.

काय असू शकते

अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, TVS Creon आधारित स्कूटर क्रॅश अलर्ट, अँटी-थेफ्ट अलर्ट, नेव्हिगेशन असिस्ट आणि शेवटचे पार्क केलेले ठिकाण यासारख्या वैशिष्ट्यांसह असेल. TVS SmartXonnect अॅपद्वारे सर्व प्रकारचे स्मार्टफोनवर उपलब्ध असतील. कंपनीच्या मते, VS Creon एका चार्जवर इको मोडमध्ये 150 किमी पर्यंत चालवता येते. स्कूटरचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असू शकतो.

टीव्हीएस इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने यासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनीने यावर्षीही तेवढीच रक्कम गुंतवण्याचे सांगितले आहे.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"