तंत्रज्ञान

ब्लू टिक असो किंवा नको, ट्विटर चालवायचे असेल तर पैसे भरावे लागतील! मस्क करु शकतात लवकरच घोषणा

तुम्ही Twitter वापरत असाल आणि तुमच्याकडे ब्लू टिक नसेल, तरीही तुम्हाला शुल्क भरावे लागेल. ट्विटरची कमान हातात येताच इलॉन मस्क यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली,

Published by : Siddhi Naringrekar

तुम्ही Twitter वापरत असाल आणि तुमच्याकडे ब्लू टिक नसेल, तरीही तुम्हाला शुल्क भरावे लागेल. ट्विटरची कमान हातात येताच इलॉन मस्क यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली, पहिले त्यांनी ट्विटरच्या उच्च पदांवर बसलेल्या भारतीयांना कंपनीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर ज्या वापरकर्त्यांना ब्लू टिक मार्क हवी असेल तर पैसे भरावे लागतील हा निर्णय घेण्यात आला. मस्कने जाहीर केले होते की ब्लू टिक वापरकर्त्यांना दरमहा सुमारे 650 रुपये मोजावे लागतील. ब्लू टिक वापरकर्ते या निर्णयाने गोंधळात पडले होते की आता बातम्या येत आहेत की तुम्ही ब्लू टिक वापरकर्ते नसले तरीही तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी फी भरावी लागेल.

परंतु सध्या सामान्य वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील की नाही याची खात्री करणे कठीण आहे. मात्र मस्कने अलीकडेच कंपनीच्या कर्मचार्‍यांसह एक बैठक घेतली, ज्यामध्ये वापरकर्त्यांना एका महिन्यात मर्यादित वेळ दिला जाईल अशी चर्चा झाली. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून सुरू करण्याची योजना घ्यावी लागेल. हा प्लान घेतल्यानंतरच यूजर्स पुन्हा ट्विटर चालवू शकतील. एलोन मस्क यांनी ट्विटरवर पदभार स्वीकारल्यानंतर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप चर्चेत आहे. ट्विटरवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते, असेही समजते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा