तंत्रज्ञान

Aadhaar Face Authentication : UIDAI ने Aadhaar मध्ये लॉन्च केलं नवं फिचर; फेस ऑथेंटिफिकेशन फिचर नेमकं काय? जाणून घ्या...

UIDAIचे नवं फिचर: आधार फेस ऑथेंटिफिकेशनने ओळख पटवा, आता आधार कार्डची कॉपी बाळगण्याची गरज नाही.

Published by : Prachi Nate

एखाद्या हॉटेलमध्ये जायचे असेल किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ओळख पटवून द्यायची असेल, तर आधार कार्डची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी मागितली जाते. पण तुम्हाला आता आधार कार्डची कॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही.

कारण आता UIDAIने एक नवं फिचर लॉन्च केलं आहे. UIDAI ने आधार कार्ड स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन फीचर अ‍ॅड केलं आहे. या फिचरच्या मदतीने चेहऱ्याला स्कॅन करून आधार कार्डची ओळख पटवता येणार मात्र यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.

माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत फेस आयडी ऑथेंटिफिकेशनबाबात माहिती दिली आहे. आधार कार्डचे फेस ऑथेंटिफिकेशन फिचर वापरायचं असेल तर काय करावं लागेल? तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला NEW Aadhaar App इन्स्टॉल करावं लागेल.

त्यानंतरअ‍ॅपमध्ये ज्या स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या आहेत, त्या कराव्यात. या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आधारची पडताळणी करू शकता. सध्यातरी आधार कार्ड फेस ऑथेंटिफिकेशन फिचर हे बिटा टेस्टिंग व्हर्जनमध्ये आहे. त्यामुळे हे फिचर वापरण्यासाठी सामान्यांना नागरीकांना थोडी वाट पाहावी लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा