तंत्रज्ञान

पाहा गजराजची धम्माल मजा

Published by : Lokshahi News

हत्ती पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो. हत्तीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाखुळ घातल आहे. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. (video of the elephant went viral on social media)

त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यात हत्ती एका पॅडलिंग पूलमध्ये खेळताना दिसतो. 45 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुंदानी नावाचा नऊ वर्षांचा हत्ती पॅडलिंग पूलमध्ये मजा आणि मस्ती करताना दिसतो आहे.

व्हिडिओमध्ये, हत्ती सुमारे 10 सेकंद विश्रांती घेतो आणि लगेच गढूळ पाण्यात खेळू लागतो. यावेळी येथे बरेच हत्ती दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर शेल्ड्रिक वाइल्डलाइफने अपलोड केला आहे, हा ट्रस्ट अनाथ हत्तींच्या बचाव आणि पुनर्वसनासाठी काम करतो. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, तुंदानी हा बचावलेल्या हत्तींपैकी एक आहे आणि 2013 मध्ये सापडला होता. अपलोड केलेला व्हिडीओला सोशल मीडियावर 8,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा