तंत्रज्ञान

Vivo Y73t 6000mAh बॅटरीसह लॉन्च, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज

Published by : Siddhi Naringrekar

Vivo ने आपला नवीन Y-सीरीज स्मार्टफोन Vivo Y73t लॉन्च केला आहे. कंपनीचा टी ब्रँडिंगचा हा लेटेस्ट फोन आहे. यापूर्वी Vivo ने Vivo Y32t आणि Vivo Y73t स्मार्टफोन्स चीनमध्ये लॉन्च केले होते. Vivo Y73T चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिलेली 6000mAh बॅटरी आहे. Vivo Y73T मध्ये 6.58 इंच LCD स्क्रीन आहे जी HD + (2408×1080 pixels) रिझोल्यूशन देते. स्क्रीन रेशो 90.62 टक्के आहे. डिव्हाइसचा रिफ्रेश दर 60 Hz आहे. Vivo Y73T मध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे.

या Vivo स्मार्टफोनमध्ये 8 GB आणि 12 GB रॅम आहे. हँडसेटमध्ये 128 GB आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. Vivo Y73T ला पॉवर करण्यासाठी, 6000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 OS आधारित OriginOS वर चालतो. फॉग ब्लू, ऑटम आणि मिरर ब्लॅक रंगांमध्ये फोन खरेदी करता येईल.

फोनच्या सुरक्षेसाठी बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. स्मार्टफोनची जाडी 9.17 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 201 ग्रॅम आहे. फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ए-जीपीएस सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo Y73t स्मार्टफोनची चीनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,399 युआन (सुमारे 15,827 रुपये) आहे. त्याच वेळी, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,599 युआन (सुमारे 18,000 रुपये) आहे. Jivice चा 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 1799 चीनी युआन (सुमारे 20,340 रुपये) मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा