Mobile Team Lokshahi
तंत्रज्ञान

Vivo Y75 मोबाईल भारतात लॉन्च, फोटोग्राफीसाठी हे आहेत फिचर

स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Published by : Saurabh Gondhali

विवोनं ( Vivo) चीनमध्ये दोन एस सीरिजचे स्मार्टफोन सादर केले आहेत. तर भारतात वाय सीरिजचा विस्तार कंपनीनं केला आहे. 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo Y75 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळतो. चला जाणून या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स. 

Vivo Y75 चे स्पेसिफिकेशन्स 

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. सोबत 8MP चा अल्ट्रा-वइड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. परंतु यातील 44MP चा फ्रंट कॅमेरा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. हा कॅमेरा सेल्फी लव्हर्स आणि व्लॉगर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. फोनमधील 4,050mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Vivo Y75 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे, ज्यात 8GB रॅम आणि 128GB मेमरी मिळते. या फोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा विवो स्मार्टफोन 31 मेपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही याची खरेदी Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाईटवरून ठेवू शकतात. कंपनीनं Moonlight Shadow आणि Dancing Waves कलर ऑप्शन सादर केले आहेत.   

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा