तंत्रज्ञान

शानदार Dimensity 810 चिपसेट असलेला स्मार्टफोन लाँच

Published by : Lokshahi News

विवो कंपनीने 'वाय' सीरीज अंतगर्त एक नवीन स्मार्टफोन Vivo Y76s नावाने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये सादर झाला असून हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो MediaTek Dimensity 810 चिपसेटसह बाजारात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स :

  • विवो वाय 76 एसमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला पॅनल आहे.
  • हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएससह ओरिजनओएस 1.0 वर चालतो. तसेच वर सांगतिल्याप्रमाणे यात मीडियाटेकचा डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे.
  • या मोबाईलमधील 8GB RAM कमी पडल्यास 4GB व्हर्च्युअल रॅमची मदत घेता येईल. हा फोन 256GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
  • फोटोग्राफीसाठी Vivo Y76s च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक फिचर आहे.विवो वाय 76 एसमध्ये कंपनीने 4100mAh ची बॅटरी दिली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • Vivo Y76s ची किंमत : विवो वाय 76 एसचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट1799 युआन म्हणजे 20,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1999 युआन अर्थात 23,100 रुपये मोजावे लागतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी