तंत्रज्ञान

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर! अँड्रॉइड युजर्ससाठी वॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट: अँड्रॉइड युजर्ससाठी व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन फीचर उपलब्ध, संवाद अनुभवात सुधारणा.

Published by : Prachi Nate

व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि बहुप्रतिक्षित फीचर सादर केले आहे. कंपनीने व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन फीचरचे बीटा वर्जन अँड्रॉइड युजर्ससाठी लाँच करायला सुरुवात केली आहे. याआधी हेच फीचर iOS च्या बीटा वर्जन 25.12.10.17 मध्ये सादर करण्यात आले होते. आता अँड्रॉइड युजर्सना देखील हे स्मार्ट फीचर वापरण्याची संधी मिळणार आहे.

या नवीन फीचरमुळे युजर्स व्हॉईस मेसेजचा मजकूर स्वरूपात (टेक्स्टमध्ये) अनुवाद पाहू शकतात. यामुळे व्यस्त वेळेत किंवा शांततेची गरज असलेल्या ठिकाणी मेसेज समजणे अधिक सोयीचे होणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा फॉर अँड्रॉइड 2.25.14.7 मध्ये उपलब्ध आहे.

ऑटोमॅटिक, ज्यामुळे सर्व व्हॉईस मेसेजेस आपोआप ट्रान्सक्राइब होतील, मॅन्युअल, ज्यात युजर आपल्या सोयीने निवडलेल्या मेसेजेस ट्रान्सक्राइब करू शकतो, आणि नेव्हर, ज्यामुळे ट्रान्सक्रिप्शन फीचर पूर्णपणे बंद करता येत, या फीचरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन.

ट्रान्सक्रिप्शनची प्रक्रिया पूर्णतः ऑन-डिव्हाइस होते, त्यामुळे माहिती कोणत्याही बाहेरील सर्व्हरवर पाठवली जात नाही. सध्या हे फीचर इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन आणि हिंदी भाषांसाठीच उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी स्टेबल वर्जनमध्ये सादर करणार आहे. हे निश्चितच युजर्सच्या संवाद अनुभवात सकारात्मक बदल घडवणारे ठरेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Ganpati Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात

Pune Ganpati visarjan : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

Ganpati visarjan 2025 : Rain Update : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?