तंत्रज्ञान

आता Whatsapp वरील चॅट होणार अजूनच मजेदार

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

बदललेल्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp कडून आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स आणले आहे. अनेक दिवसांपासून WhatsApp वर रीड लेटर आणि मल्टी डिव्हाइस सपोर्ट फिचर येणार असल्याची चर्चा होती. पण आता एका नवीन रिपोर्टनुसार कंपनी स्टिकर शॉर्टकट नावाच्या एका फिचरवर काम करत आहे.

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, हे फिचर चॅट बारमध्ये पाहायला मिळेल. नव्या फिचरचं काम तुमच्यासाठी योग्य स्टिकर शोधणं सोपं करणं असेल. याचा अर्थ त्या शब्दाशी किंवा इमोजीशी निगडीत स्टिकरही उपलब्ध आहे. हे स्टिकर बघण्यासाठी तुम्हाला की-बोर्डच्या आयकॉनवर टॅप करावं लागेल, नंतर स्टिकर्स समोर येतील. इथूनच तुम्ही स्टिकर्स वापरता येतील. काही दिवसांनी हे फिचर बीटा युजर्ससाठी उपलब्ध होईल.

नवीन अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक
स्टिकर शॉर्टकट फिचरशिवाय कंपनी आपल्या अँड्रॉइड आणि iOS अ‍ॅप्ससाठी एक नवीन अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक जारी केलंय. याचा वापर व्हॉट्सअ‍ॅप वेब युजर्सही करु शकतात. युजर्सना हे पॅक डाउनलोड करण्यासाठी sticker store मधून डाउनलोड करावं लागेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक