सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग App अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (whatsapp). फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाइल्स, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल अशा अनेक गोष्टींसाठी हा अॅप वापरता येतो. तसेच व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवीन फीचर्स वापरत्याकर्त्यांसाठी घेऊन येत असते. अगदी ऑफिसच काम असलं तरी ते व्हॉट्सअॅपवरून केलं जाते. यामुळे सर्वाधिक व्हॉट्सअॅप वापरले जाते.
व्हॉट्सअॅप लवकरचं मेसेज एडिटींगचं फीचर आणणार आहे. त्यावर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर एडिट (Edit) बटणाची चाचणी करण्यात येणार आहे. याआधी मेसेज चुकला तर एकापाठोपाठ एक मेसेज डिलीट केला जात असे. पण आता तो मेसेंज एडीट करता येणार आहे. पाठवलेल्या मेसेजमध्ये फेरबदल करता येत नसल्याने तो डिलीट करावा लागतात असे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता एडीट बटण हे नवीन फीचर्स उपलब्ध करणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप iOS आणि डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये देखील अशीच वैशिष्ट्ये असणार आहेत. याबद्दलची अधिक माहिती समोर आली नाही आहे.
याबद्दलचे वृत्त व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने (Wabetainfo) दिले आहे. या फीचर्सवर पाच वर्ष व्हॉट्सअॅप काम करत होते. पण त्यानंतर कंपनीने या फीचर्सवर काम करणं बंद केलं आहे. आता पुन्हा एकदा एडीट बटणावर व्हॉट्सअॅप काम करायला सुरूवात केली आहे.
व्हॉट्सअॅप पहिले पाठवलेले मेसेज सिलेक्ट करून कॉपी (Copy) आणि फॉरवर्ड (Forward) करता यायचे.आता त्याचंबरोबर वापरकर्त्यांना एडीट हा पर्याय व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे. एडीट या फीचर्समुळे चुकीचा टायपिंग झालेला मेसेज दुरूस्त करता येणार आहे. म्हणजेच आता व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट न करता एडीट करता येणार आहे.