तंत्रज्ञान

Whatsapp Feature : व्हॉट्सऍपचे व्हॉइस मेसेज सिंगल टॅप फिचर लवकरच...

सध्या हा अपडेट iOS बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून, लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठीही रिलीज होण्याची शक्यता आहे.

Published by : Shamal Sawant

व्हॉट्सऍपने व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी एक नवीन फिचर बीटा युजर्ससाठी सादर केले आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्ते आता फक्त एकदाच टॅप करून आपला वॉईस मेसेज सहज रेकॉर्ड करू शकतील. सध्या हा अपडेट iOS बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून, लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठीही रिलीज होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपने बीटा वर्जन 25.12.10.70 मध्ये वॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शनसाठी एक फिचर आणले होते, ज्यामध्ये युजर्सना वॉईस मेसेज ऑटोमॅटिकली ट्रान्सक्राइब करण्याचा, मॅन्युअली ट्रान्सक्राइब करण्याचा किंवा हे फिचर डिसेबल करण्याचा पर्याय दिला होता. सध्या याची बीटा चाचणी सुरू आहे.

नवीन सिंगल टॅप फिचरविषयी माहिती देताना, WABetaInfo ने X (आधीचे ट्विटर) वर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आतापर्यंत वापरकर्त्यांना वॉईस मेसेज रेकॉर्ड करताना मायक्रोफोन बटण दीर्घकाळ दाबून ठेवावे लागत असे किंवा बटण दाबून वर स्वाइप करून लॉक मोड सक्रिय करावा लागत असे. या दोन्ही पद्धतींमध्ये आता सुधारणा केल्या गेल्या आहेत.

नवीन अपडेटमध्ये, मायक्रोफोन आयकॉनवर एकदा टॅप करताच वॉईस रेकॉर्डिंग सुरू होईल आणि लॉक मोड आपोआप ऍक्टिव्हेट होईल. त्यामुळे मेसेज रेकॉर्ड करताना बटण दाबून ठेवण्याची किंवा वेगळे लॉक ऍक्टिव्हेट करण्याची गरज भासणार नाही.

हा छोटासा बदल वापरकर्त्यांचा व्हॉईस मेसेज रेकॉर्डिंगचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवेल आणि जास्त व्हॉईस मेसेज पाठवण्यासाठी प्रोत्साहित करेल. सध्या फिचर बीटा वर्जनमध्ये उपलब्ध असून, बीटा टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर लवकरच याचे स्टेबल अपडेट स्वरूप सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी