The governor left halfway through the speech 
Mumbai

Maharashtra Assembly Budget Session 2022 | राज्यपाल अभिभाषण अर्ध्यात सोडून गेले, कारण…

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session 2022) आजपासून सुरु झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मिळाले होते. अशातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अभिभाषण सुरु केले मात्र विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेतले. सभागृहात गोंधळ झाल्यामुळे राज्यपालांनी भाषण थांबवले आणि सभागृहातून बाहेर पडले.

भाजपच्या आमदारांनी नवाब मलिकांच्या (Nawab Malik)  राजीनाम्यावरुन गदारोळ केला यामुळे राज्यपाल भाषण थांबवून निघाले. दरम्यान राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या (mahavikas aagadhi) नेत्यांकडूनही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाची(Maharashtra Assembly Budget Session 2022) सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणाने सुरुवात होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अभिभाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला सभागृहात शांतता होती परंतु राज्यपालांनी अभिभाषण सुरु केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंदळ झाल्यामुळे राज्यपालांनी आपले भाषण संपवले. राज्यपालांनी काही मिनिटातच आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर पडले. राष्ट्रगीत होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभागृह सोडले असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांचा निषेध
सत्ताधारी महाविकास आघाडी (mahavikas aagadhi)  सरकारमधील आमदारांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल सत्ताधारी सरकारने केलेल्या कामांबाबत माहिती देत असतात. परंतु राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेऊन काढता पाय घेतला. राष्ट्रगीताला न थांबता राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचे महाविकास आघाडीतील आमदारांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरुनही राज्यपालांचा निषेध केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर