Headline

पोटच्या मुलीचा गळा दाबून आईनेही संपविली जीवनयात्रा

Published by : Lokshahi News

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांकडे माहेरी आलेल्या 35 वर्षीय येथील महिलेने पतीच्या मृत्यूनंतर आठ दिवसातच आपल्या कुटुंबाचा शेवट केला आहे. मानसिक तणावातून पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीचा गळा दाबून स्वतःही गळफास घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून शोक व्यक्त होत आहे.

या अडीच वर्षीय मुलीचे नाव आराध्या आहे. मुलीच्या मृत्यूनंतर आई कविताने स्वतःला घरातच पंख्याला अडकवून गळफास घेतला. हिंगणघाट येथील तुकडोजी वॉर्ड स्थित आशिष नगर परिसरात ही घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कविता हिचे पती नरेंद्र मोहदूरे याने गेल्या काही दिवसांपूर्वी वर्ध्यात एका जिनिंग मागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येनंतर नैराश्य आल्याने कविताने हे पाऊल उचलले असावे अशीच चर्चा सध्या हिंगणघाट शहरात आहे.

अवघ्या आठ दिवसात संसार उद्धवस्त करीत सम्पूर्ण कुटुंबच संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नैराश्य आणि मानसिक तणावातून हा प्रकार घडला असला तरी नेमक्या कारणांचा शोध हिंगणघाट पोलीस घेत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे घटनास्थळी पोहचले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा