Covid-19 updates

….मग लसीकरणासाठी 35 हजार कोटींचा खर्च कशाला? पतंजलीच्या कोरोनीलवरून आयएमए संतप्त

Published by : Lokshahi News

रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या 'कोरोनील' या कोरोना प्रतिबंधक औषधाची दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखात घोषणा करण्यात आली. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएनशनने (आयएमए) याला तीव्र आक्षेप घेतला आहे. हे औषध कोरोना रोखण्यास प्रभावी ठरत असेल तर, सरकार लसीकरणासाठी 35 हजार कोटी कशासाठी खर्च करीत आहे? असा संतप्त सवाल आयएमएने विचारला आहे.

पतंजलीने हे औषध लॉन्च केले तेव्हा केंद्रीय आऱोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावरून देखील आयएमने सवाल उपस्थित केला आहे. अवैज्ञानिक उत्पादनाला आरोग्यमंत्री कसे काय प्रोत्साहन देऊ शकतात? तसेच कोरोनाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता किंवा प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालाने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आयएमएने म्हटले आहे की, आरोग्यमंत्री स्वतः एक डॉक्टर असताना त्यांच्या समक्ष, हे औषध डब्ल्यूएचओने प्रमाणित केल्याचा खोटा दावा का करण्यात आला? आरोग्यमंत्र्यांनी याबाबत देशाला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आयएमएने केली आहे.


ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) मान्यता दिल्याचे पतंजलीकडून जाहीर करण्यात आले आहे. तथापि, हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करून त्यांच्या जीविताशी खेळणारा असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

पतंजलीने आधी केली होती सारवासारव
गेल्या वर्षी जूनमध्ये कोरोनील औषध पतंजलीने लॉन्च केले होते. यावर जोरदार टीका झाल्यावर केंद्राच्या आयुष मंत्रालयाने याबाबत हात वर केले होते. नंतर पतंजलीने हे औषध केवळ इम्युनिटी बुस्टर असल्याची सारवासारव केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा