India

कंडोम नाही म्हणून केला गमचा वापर, शारीरिक संबंध करताना झाला तरुणाचा मृत्यू

Published by : Lokshahi News

गुजरातच्या अहमदाबाद शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक संबध ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आणि ती नैसर्गिकरीत्या झालेलीच उत्तम. गुजरातच्या
एका तरुणाने तरुणीसोबत शरीर संबंध ठेवताना कंडोम नाही म्हणून स्वत:च्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा प्रयोग केला. पण हा प्रयोग त्याच्या अंगाशी आला. फेविक्विकमुळे मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतक हा ड्रग्जचं देखील सेवन करायचा, अशी देखील माहिती समोर आली आहे.

संबंधित घटना ही अहमदाबाद शहरातील फतेहवाडी परिसरात घडली आहे. मृतक 25 वर्षीय तरुणाला ड्रग्जच्या सेवनाचं व्यसन होतं. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघांनी ड्रग्जचं सेवन करुन शारीरिक संबंध बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते हॉटेलमध्ये येताना कंडोम विसरले होते. यावेळी त्यांच्याजवळ फेविक्विक होतं. त्यांच्याकडे फेविक्विक राहण्यामागे एक वेगळं कारण होतं. व्हाईटनरमध्ये असणाऱ्या द्राव्यात मिसळून त्या द्राव्याचं ते ड्रग्स म्हणून सेवन करणार होते. कारण त्याच्याने देखील नशा येते, असा त्यांचा समज होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीर संबंध ठेवण्याआधी सावधानतेचा मार्ग म्हणून कंडोमचा विचार केला. पण त्यावेळी त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान नको असलेली गर्भधारणा झाली तर? या विचाराने त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तो शहरातील अंबर टॉवरजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. तो ड्रग्जचं सेवन करत असल्याने तो बेशुद्ध झाला असेल असं त्याच्या आई-वडिलांना वाटलं. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्याने डोळे उघडले नाहीत तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा