२०२४ या वर्षात सिनेजगतातील काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. या दिग्गजांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. कोण आहेत हे कलाकार पाहुया...
मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचा कॅन्सरशी झुंज देताना मृत्यू झाला. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले.
गजल सम्राट पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील अभिनेता विकास सेठीचे ८ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले.
वर्ष सरताना प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन झालं.
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छोट्या पडद्यावरील अभिनेता ऋतुराज सिंह जे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
'दंगल' सिनेमात काम करणारी सुहानी भटनागरने वयाच्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.