Chennai Super Kings 
IPL T20 2021

IPL 2022: चेन्नईचा ‘हा’ खेळाडू व्हिसा संबंधित अडचणींमुळे IPL साठी उशिरा पोहोचणार…

Published by : Vikrant Shinde

उद्या (26-03-2022) IPL चा 15वा हंगाम सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामात
पहिलाच सामना चेन्नई विरूद्ध कोलकाता (CSK Vs. KKR) आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni Retirement as captain) चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच, आता इंग्लंडचा खेळाडू मोईन अलीला (British Cricketer Moeen Ali) सुद्धा भारतात पोहोचायला उशिर होण्याची शक्यता आहे.

इंडियन हाय कमिशनकडून परवानगी मिळण्यास उशीर:
व्हिसा संबंधित अडचणींमुळे मोईन अली IPL मध्ये उशिरा सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला इंडियन हाय कमिशनकडून (Indian High Comission) परवानगी मिळण्यास उशीर लागला होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction) चेन्नईनं मोईन अलीला संघात कायम ठेवलं होतं.

काय म्हणाले CSK चे CEO काशी विश्वनाथन?
"मोईन अलीनं 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता. अर्ज करून 20 दिवस उलटून गेले आहेत. मोईन अलीला व्हिसाची परवानगी मिळाली की नाही? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही", असं चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन (CSK's CEO Kashi Vishwanathan) म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा