Vidhansabha Election

Threat To Yogi Adityanath: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ जीवे मारण्याची धमकी

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वपक्षांना आता प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस उरले आहेत. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांच नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत असं असताना आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून मेसेज पाठवण्यात आला आहे. योगी यांनी १० दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्धीकीसारखे मारू असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ देखील राज्यात प्रचार करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यामुळे आता या धमकीची खळबळ उडाली आहे.

दरम्यान या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे, तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र हा मेसेज कोणी पाठवला आणि याचा संबंध अचानक लॉरेन्स बिश्नोई गॅंगसोबत आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. तसेच हा मेसेज आता विधानसभी निवडणूक असताना या पार्श्वभूमीवर योगी आदीत्यनाथ यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे याचा संबंध निवडणुकीसोबत पण आहे असा देखील प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा