हिंदू कॅलेंडरनुसार सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विन किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसुबारस. दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे.