Bye Bye 2024

Top Grossing Movies 2024: बॉलिवूड आणि साऊथचे टॉप 5 चित्रपट ज्यांनी 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर केली छप्पर फाड कमाई

बॉलिवूड आणि साऊथच्या टॉप 5 चित्रपटांनी 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई. जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले सर्वाधिक हिट.

Published by : Team Lokshahi

2024 हे वर्ष एक अविश्वसनीय वर्ष ठरले आहे, 2024 हे वर्ष पुर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक काही अविश्वसनीय गोष्टी या वर्षात घडून गेल्या आहेत. त्यात पण हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अनोख ठरल आहे, कारण या वर्षात 100 हून अधीक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यामध्ये चांगल्या बजेटच्या चित्रपटांपासून ते कलात्मक चित्रपटांचाही समावेश आहे. यांपैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवले आहे. वर्ष संपण्यापूर्वी पाहूयात बॉलिवूड आणि साऊथचे टॉप 5 चित्रपट ज्यांनी 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर केली छप्पर फाड कमाई केली.

1. कल्कि -2898 इ.स

यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतो दक्षिणात्य चित्रपट कल्कि -2898 इ.स जो 27 जून 2024ला प्रदर्शित झाला आणि अंधाराविरुद्ध युद्ध सुरू करणाऱ्या भगवान विष्णूच्या अंतिम अवताराची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन,दीपिका पादुकोण आणि कमल हसन हे पाहायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1052.5 कोटींची कमाई केली.

2. पुष्पा 2

यानंतर सध्या जोरदार चर्चेमध्ये असणारा अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 या तित्रपटाने चाहत्यांमध्ये एवढी लोकप्रियता मिळवली की चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तुफान गाजला आणि या चित्रपटाने 8व्या दिवसापर्यंत 950.7 कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत.

3. स्त्री 2

15 ऑगस्ट 2024 ला रिलीज झालेला एक हॉरकॉम चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि इतर अनेक कलाकारांचा भुरळ पाडणारा अभिनय पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाने 858.4 कोटींस बॉक्स ऑफिसवर कलेक्शन मिळवले आहे.

4. देवरा

एनटी रामाराव जूनियर, जान्हवी कपूर, सैफ अली खान आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश असलेल्या देवरा या चित्रपटासह चित्रपटातील एका गाण्याने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. 27 सप्टेंबर 2024ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 443.8 कोटींचे कलेक्शन केले.

5. भूल भुलैया 3

भूल भुलैया 3 या चित्रपटात कार्तिक आर्यन, दिग्गज विद्या बालन आणि माधुरी दीक्षित प्रतिभावान कलाकारांचा समावेश पाहायला मिळाला. हा चित्रपट हॉरकॉम तर होताच पण त्याचसोबत या चित्रपटात ॲक्शन आणि थ्रिलरचा चांगला मेळ पाहायला मिळाला. 1 नोव्हेंबर 2024 ला रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 396.7 कोटींची उल्लेखनीय कमाई केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा