वनजमिनीच्या (Forest land) मुद्यावर आज राज्यभरातील आदिवासींनी मुंबईत आदिवासी (Tribal Protest in Mumbai) विकास मंत्री के.सी. पाडवी (k.c.padave) यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अचानकपणे आंदोलक जमा झाल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. वनजमिन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच आज सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर धरणे आंदोलन असणार आहे.
आदिवासींच्या (Tribals) वनजमिनीच्या प्रश्नांबाबत याआधी 16 फेब्रुवारी रोजी शिष्टमंडळासोबत भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते, अधिकाऱ्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. सध्या राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यांचा दौरा करणे शक्य नाही. अधिवेशनानंतरचा या बैठका होऊ शकतात. मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर काही प्रश्न सुटले आहेत. तर, वनजमिनीच्या दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे दावे प्रलंबित आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेता येईल असेही पाडवी यांनी म्हटले.